लवकरचआई बाबांची शाळा नव्या रूपात चालू होत आहे — आजच नोंदणी करा →
मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा? — ५ Practical सूत्रं
सर्व लेखPersonality

मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा? — ५ Practical सूत्रं

Confidence जन्मजात नसतो — तो रोजच्या छोट्या interactions मधून घडतो. पालक काय करू शकतात याचा संपूर्ण roadmap.

Dr. Amol Rawjade 26 May 2026 6 min read

'माझा मुलगा खूप hush-bush आहे, कुणाशी बोलत नाही' — हे वाक्य workshop मध्ये रोज ऐकतो. पण आत्मविश्वास म्हणजे फक्त बोलकेपणा नाही. आत्मविश्वास म्हणजे — 'मी चूक केली तरी मी valuable आहे' अशी आतून येणारी जाणीव.

१. Process चं कौतुक करा, result चं नाही

'९५% आणलेस म्हणून हुशार' ऐवजी 'रोज २ तास मनापासून अभ्यास केलास म्हणून आज result आला' — हे फरक आत्मविश्वासाचा पाया घडवतं. Carol Dweck यांचं 'Growth Mindset' research हेच सांगतं — process-praise मुलं challenges स्वीकारतात, result-praise मुलं risk घ्यायला घाबरतात.

२. छोट्या जबाबदाऱ्या — रोज

स्वतःचं ताट उचलणं, lunch box धुणं, छोट्या भावाला पाणी देणं — रोजच्या या जबाबदाऱ्या 'मी काही करू शकतो' ही feeling घडवतात. प्रत्येक यशस्वी काम = आत्मविश्वासाची एक वीट.

३. Mistakes celebrate करा

"घरात एक नियम — 'Mistake of the week'. आठवड्यात सर्वात मोठी चूक कोणी केली ती सांगायची आणि त्यातून काय शिकलं ते celebrate करायचं."

जिथे चूक केली की ओरडा खातो, तिथे मूल कधीच नवीन प्रयत्न करत नाही. आणि नवीन प्रयत्न नाही = आत्मविश्वास नाही.

४. Comparison बंद — तुलना फक्त स्वतःशी

'शेजारच्या रिया कडे बघ' — हे एक वाक्य आत्मविश्वासाचा खून करतं. त्याऐवजी 'गेल्या महिन्यात तू कुठे होतास आणि आज कुठे आहेस' — ही comparison healthy.

५. Choice द्या — Power द्या

'आज निळा shirt की पांढरा?', 'भाजी आधी की पोळी?', 'अभ्यास ५ वाजता की ६ वाजता?' — रोज छोटे choices मूलाला 'मला control आहे' ही feeling देतात. ही feeling हाच आत्मविश्वासाचा गाभा.

वयानुसार रणनीती

  • ३-६ वर्षे: 'मी स्वतः करू शकतो' — boot लावणं, खेळणी आवरणं.
  • ७-१० वर्षे: छोटी responsibility — pet, plant, छोटा भाऊ.
  • ११-१४ वर्षे: स्वतःचे निर्णय — कपडे, hobby, मित्र.
  • १५+ वर्षे: मोठे decisions मध्ये भागीदारी — career, college.

Red Flags — कधी काळजी घ्यायची?

  • मूल कोणत्याच activity मध्ये भाग घेत नाही.
  • सतत 'मला नाही जमणार' म्हणतं.
  • स्वतःबद्दल negative बोलतं — 'मी वाईट आहे'.
  • मित्रांमध्ये गेल्यावर पूर्णपणे शांत.

अशा वेळी counselor किंवा child psychologist चा सल्ला घ्या. लवकर intervention = लांब-पल्ल्याचा फायदा.

तुमच्या मुलाची खरी क्षमता ओळखा

मोफत Psychometric Test घ्या — रिपोर्ट WhatsApp वर.

Counseling सुरू करा
Connect

आमच्या सोबत connect व्हा

नाव, email आणि WhatsApp नंबर द्या — नवीन sessions, मोफत resources आणि updates तुम्हाला सर्वात आधी मिळतील.

Membership

आरोग्यदायी पालक, बुद्धिमान बालक, समृद्ध कुटुंब

Silver · Gold · Diamond — workshops, psychometric test, brain activation, counseling आणि couple sessions एका membership मध्ये. आजच तुमच्या कुटुंबासाठी पुढचं पाऊल घ्या.